Join us  

"रसिकासोबत काम करुन नाविन्य बाहेर येईल, पण स्पृहा..." अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 2:21 PM

'सूर नवा ध्यास नवा' चं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नव्हे तर रसिका सुनील करणार आहे

'सूर नवा ध्यास नवा' चं नवीन पर्व सुरु होत आहे. हे सहावं पर्व आहे. गाण्यांची सुरेल मैफिल असणारा हा संगीत रसिकांचा कार्यक्रम पुन्हा येतो. या नवीन पर्वात अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे स्पृहा जोशीला (Spruha Joshi) यावेळी सगळेच मिस करतील. तर अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte), महेश काळेच नेहमीप्रमाणे परिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. 

यंदाच्या  पर्वाचा विषय तरुणाईच्या संगिताचा आवाज असणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुणाई आपलं टॅलेंट मंचावर सादर करतील. आज तरुणाईचा सूर काय आहे हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न असणार आहे. याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्ते म्हणाला, 'पिढी दर १० वर्षांनी बदलत जाते. आजचा तरुणाईचा सूर बेधडक, बेफिकीर आहे. पूर्वीचं बुजरेपण नाहीए. सांगितीकदृष्ट्या तो काय आहे हे आपल्याला कार्यक्रमातून कळेल.'

तो पुढे म्हणाला, 'यावेळी नक्कीच स्पृहाला मिस करेन. पण आता रसिकासारखं नवीन नाव आलंय. माझं आणि स्पृहाचं एक बाँड क्रिएट झालं होतं.  आता रसिकाबरोबर काम केल्यावर नक्की काहीतरी नाविन्य बाहेर येईल याची मला खात्री आहे.'

'सूर नवा ध्यास नवा' संगीत रसिकांचा लाडका कार्यक्रम आहे. जु्न्या गाण्यांपासून ते नवीन अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांची या कार्यक्रमातून ओळख होते. अनेक टॅलेटेंड स्पर्धक समोर येतात आणि त्यांनाही एक व्यासपीठ मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम नक्कीच खास आहे. यंदाच्या पर्वाबद्दलही रसिकांमध्ये उत्सुकता ताणली आहे.

टॅग्स :अवधुत गुप्ते मराठी गाणीस्पृहा जोशीरसिका सुनिल