Join us

तेजस्वी प्रकाशसह हे कलाकारही असणार 'रिश्ता लिखेंगे हम नया' मालिकेचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:19 IST

शशी सुमित प्रॉडक्शनसह आपला आगामी शो लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे.या मालिकेची सध्या खूप चर्चा सुरू असून रसिकांमध्येही ...

शशी सुमित प्रॉडक्शनसह आपला आगामी शो लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे.या मालिकेची सध्या खूप चर्चा सुरू असून रसिकांमध्येही अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे.'रिश्ता लिखेंगे हम नया' या मालिकेची कथा खूपच वेगळी असून एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा सेट हा भव्य असणार असून या सेटवर निर्मात्यांनी खूप सारा खर्च केला आहे. रिश्ता लिखेंगे हम नया ही मर्यादित भागांची मालिका असणार आहे.स्त्रीचे एक वेगळे रूप या मालिकेद्वारे प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. जतीन लालवानी, गिरीश सचदेव, सिद्धार्थ शिवपुरी,अदिति देशपांडे, हरमीत कौर, मीनु रांचल, आशेर भरद्वाज, कस्तुरी मैत्र, मनिषा सक्सेना आणि वरुण जैन हे कलाकार आहेत.काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांना 'पहरेदार पिया की' ही मालिका पाहायला मिळाली होती. या मालिकेत एक आठ वर्षांचा मुलगा आणि एक १८ वर्षांची तरुणी यांचे लग्न दाखवण्यात आले होते. प्रेक्षकांना ही कथा न रुचल्यामुळे या मालिकेविरोधात इंडियन ब्रॉडकास्टिंग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिलकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. या गोष्टीची गंभीर दखल घेत ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मालिका शशी सुमित प्रॉडक्शन हाऊसची होती. आता हेच प्रोडक्शन हाऊस प्रेक्षकांसाठी रिश्ता लिखेंगे हम नया ही नवीन मालिका घेऊन आले असून या मालिकेत प्रेक्षकांना पहरेदार पिया की याच मालिकेतील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत तेजस्वी प्रकाश वायंगणकर ही दियाची भूमिका तर रोहित सुचान्ति रतनची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.आशिष गोळवलकर, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे वरिष्ठ क्रिएटिव्ह डायरेक्टर 'ये उन दिनों की बात है'ला खूप पसंती मिळत आहे.हा शो यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर आम्ही शशी सुमित सोबत पुन्हा एकदा राजस्थानच्या पार्श्वभूमीवरील एक सुंदर एक कथा घेऊन येत आहोत.दियाच्या या मनोरंजक गोष्टीबद्दल आणि तिचे बलिदान हे प्रेक्षकांना आवडेल असा आमचा ठाम विश्वास आहे.”सुमित मित्तल,शशी सुमित प्रॉडक्शनचे संस्थापक आणि संचालक आम्ही आमच्या सर्व समर्थकांचे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार,शशी सुमीत प्रॉडक्शन आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नवीन कथा आणण्यासाठी नेहमीच पुढे असते.'रिश्ता लिखेंगे हम नया'मध्ये कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार असून वेगळ्या संकल्पनेमुळे  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.या मालिकेपासून रसिकांना प्रचंड अपेक्षा आहेतच.त्यापेक्षा त्यांना ही नव्या स्वरूपातील मालिका पाहण्याची अधिक उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.याच गोष्टीचा आम्हाला जास्त आनंद असून रसिकांचे पुन्हा एकदा त्याच जोमात मनोरंजन करण्यास सज्ज आहोत.