चाहतच्या घरी नन्ही परीचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 13:28 IST
बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चाहत खन्नाने नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला. चाहत ...
चाहतच्या घरी नन्ही परीचे आगमन
बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चाहत खन्नाने नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला. चाहत गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. कबूल है या मालिकेनंतर ती छोट्या पडद्यावर झळकलीच नाही. 2013ला चाहत खन्नाने फरहान मिर्झासोबत लग्न केले. फरहान हा प्रसिद्ध लेखक शाहरुख मिर्झा यांचा मुलगा आहे. फरहाननेच ही गोड बातमी मीडियाला दिली आहे. तो सांगतो, "चाहत आणि बाळ दोघींचीही तब्येत चांगली असून आमच्या आयुष्यात आलेल्या या नन्ही परीमुळे सध्या आम्ही खूपच खूश आहोत. आम्ही तिचे नाव जोहर असे ठेवायचे ठरवले आहे. जोहरचा अर्थ देवाचा प्रकाश असा होतो."