Join us

अन्वेषा चे मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 12:05 IST

स्टार व्हाइस आॅफ इंडिया, छोटे उस्ताद या रियालीटी शो मधून नावारूपास आलेली बंगाली गायिका अन्वेषा  हिने आपल्या सुरेख आवाजाने ...

स्टार व्हाइस आॅफ इंडिया, छोटे उस्ताद या रियालीटी शो मधून नावारूपास आलेली बंगाली गायिका अन्वेषा  हिने आपल्या सुरेख आवाजाने बॉलीवुडदेखील गाजविले. इतक्या लहान वयात केलेले कार्य पाहता खरचं कौतुकास्पद आहे. अन्वेषा बॉलीवुडमध्ये गोलमाल रिटर्न्स , डेंजरस इश्क, रांझना, कांची द अनब्रेकेबल, रीवोल्वर राणी, प्रेम रतन धन पायो या बिगबजेट चित्रपटांनादेखील आपला आवाज दिला आहे. आता हीच तगडी गायिका तुज्या विना या गाण्यामार्फत मराठीत पदार्पण करत आहे.या गाण्याला संगीतकार प्रसाद फाटक यांनी संगीत दिले आहे. तुज्या विना हे एक रोमांटिक गाणं असुन पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर हे चित्रित करण्यात आले आहे. अन्वेषा हे गाणे ऐकण्यास आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार हे नक्की.