Join us  

'अनुपमा'लाही आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, धक्कादायक खुलासा करत म्हणाली, "म्हणून मी सिनेमा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:15 PM

नुकत्याच एका मुलाखतीत रुपालीने खुलासा केला की ती देखील कास्टिंग काउचची शिकार झाली होती.

अभिनेत्री रुपाली गांगुली हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिका 'अनुपमा'मधून ती घराघरात पोहोचली. रुपालीपेक्षाही ती अनुपमा या नावानेच जास्त प्रसिद्ध आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ही अभिनेत्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, मात्र 'अनुपमा'मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रुपाली ही  फिल्ममेकर अनिल गांगुली यांची मुलगी आहे. असे असतानाही तिला सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. नुकताच अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत रुपालीने खुलासा केला की ती देखील कास्टिंग काउचची शिकार झाली होती, त्यानंतर तिने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले. रुपालीने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितले.

रुपाली म्हणाली, “कास्टिंग काउच त्यावेळी इंडस्ट्रीत होते.. माझ्यासारख्या लोकांना याचा सामना करावा लागला म्हणून मी हा  पर्याय न निवडण्याचा निर्णय घेतला. रुपाली गांगुलीने सांगितले,  जेव्हा तिने टेलिव्हिजनमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझं कुटुंब आणि मित्रपरिवार माझ्याकडे अपयशी कलाकार म्हणून पाहत होते. कारण ती एका फिल्मी कुटुंबातून येऊन ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत होती. 

ती म्हणाली, 'त्यावेळी मी स्वत:ला तुच्छ लेखत होते, पण आज मला स्वत:चा खूप अभिमान वाटतो. माझ्या अनुपमाने मला असा ते स्थान दिले आहे ज्याचे मी नेहमीच स्वप्न पाहिली होती. 

रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले. पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली.

टॅग्स :टिव्ही कलाकारकास्टिंग काऊच