Join us

लोकप्रिय मराठी अभिनेत्याची पत्नी आहे वकील, 'या' जोडीचं सर्वांना कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:08 IST

आपल्या आवडत्या कलाकारांचे जोडीदार काय करतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते.

आपल्या आवडत्या कलाकारांचे जोडीदार नेमके काय करतात, त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. मराठी टेलिव्हिजनवर आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणारा लोकप्रिय अभिनेता श्रमेश बेटकर हाही त्यापैकीच एक. प्रेक्षकांचा लाडका हास्यवीर श्रमेश बेटकर मनोरंजन विश्वात सक्रिय असला तरी त्याची पत्नी ही मात्र या क्षेत्रापासून दूर आहे. पण आता तिच्याबद्दल एक खास गोष्ट समोर आली आहे, जी अनेकांना माहीत नव्हती.

श्रमेश बेटकर हा एक प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे, जो विशेषतः 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. प्रेक्षकांचा लाडका हास्यवीर श्रमेशची पत्नी सावी ही मात्र कलाक्षेत्रापासून दूर आहे. अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे ती व्यवसायाने वकील आहे. दोघांचेही प्रोफेशन वेगवेगळे असले तरी ते एकमेकांच्या कामाचा खूप आदर करतात. 

मूळचा रत्नागिरीचा असणारा श्रमेश सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो आणि अनेकदा सामाजिक विषयांवरही भाष्य करताना दिसतो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असूनही, श्रमेश आणि सावी एकमेकांना पाठिंबा देत आहेत.   सावी आपल्या कामासोबतच घर आणि कुटुंबाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळते. सावी खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :मराठी अभिनेता