Join us

अंकिता कुणाला पंच मारण्याचं घेत आहे ट्रेनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 16:59 IST

छोट्या पडद्यावरील पवित्रा रिश्ता मालिकेतील मानव आणि अर्चनाची म्हणजेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे ही जोडी रसिकांनी डोक्यावर ...

छोट्या पडद्यावरील पवित्रा रिश्ता मालिकेतील मानव आणि अर्चनाची म्हणजेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे ही जोडी रसिकांनी डोक्यावर घेतली. या मालिकेनंतर दोघांचं एकमेंकांशी असलेलं नातं आणखी घट्ट झालं. दोघांमध्ये प्रेमाकुंर फुलू लागले. दोघेही रेशीमगाठीत अडणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या असताना त्यांच्या प्रेमाला जणू काही कुणाची नजर लागली आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर बॉलीवुडमधील इनिंगमुळे तसंच महेंद्रसिंह धोनीवरील सिनेमामुळे सुशांतच्या करियरनं भरारी घेतली. ब्रेकअप झालं असले तरी अंकिता असो किंवा सुशांत कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. सुशांतशी झालेल्या ब्रेकअपनंतर आता अंकिताला आता एकटं वाटू लागल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. त्यामुळेच ती या ना त्या गोष्टीमध्ये आपलं मन रमवत एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करत असते. कधी तिच्या मेकओव्हरच्या बातम्या येतात तर कधी सुशांतप्रमाणेच अंकिताही बॉलीवुडमध्ये एंट्री मारणार असल्याचे कानावर पडते. आता पुन्हा एकदा अंकिता चर्चेत आलीय. यावेळी तिच्या चर्चेचं कारण थोडं हटके आहे. यावेळी कोणत्या सिनेमा किंवा मालिकेमुळे अंकिता चर्चेत आलेली नाही. सध्या अंकिता बॉक्सिंगच्या मैदानात उतरलेली पाहायला मिळतेय. बॉक्सिंगचे ट्रेनिंग घेतानाचा फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे अंकिता बॉक्सिंगचे ट्रेनिंग का घेते आहे ? ती खरेच बॉक्सिंगचे प्रशिक्षण सिनेमासाठी घेते का ? की बॉक्सिंगचे धडे घेऊन ती कुणाला पंच देणार की काय अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगतायत. दुसरीकडे अंकिताचा एक्स-बॉयफ्रेंड सुशांतसिंह राजपूत सध्या राफ्ता या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात त्याची नायिका असलेल्या कृती सॅनॉनसह त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.