Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जवळ आलं असताना अंकिता लोखंडेची बिघडली तब्येत, रुग्णालयात करावं लागलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:02 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार अभिनेत्रीला इमरजन्सीमध्ये  मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती ठीक असून डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अंकिता सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे. ती स्वत: तिच्या सोशल अकाऊंटवर तिच्या लग्नाविषयी रोज काही ना काही शेअर करत असते.

या महिन्यात १४ डिसेंबरला अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे. अंकिताची मैत्रिण श्रद्धा आर्य हिने नुकतेच तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोघांच्या लग्नाचे कार्ड शेअर केले आहे. अंकिता आणि विकी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 7 फेरे घेणार आहेत. अंकिताने अलीकडेच तिच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता जो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अंकिता विकीसोबत खूपच सुंदर दिसत आहे. 

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेला काल रात्री पायाला दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळाने तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज सुद्धा दिला. मात्र तरीही डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अंकिताला दुखापत कशी झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या या सुंदर जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडे