Join us  

‘मनमोहिनी’च्या सेटवर अंकित सिवाच बनला ‘फिटनेस कोच’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 6:02 PM

आपल्या सर्व सहकलाकारांनाही आपल्याप्रमाणे नियमित व्यायाम करण्यास अंकितने भाग पाडले आहे. त्याबरोबर तो आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी कोणता आहार करावा आणि कधी-कसे खावे, याचेही मार्गदर्शन करीत असतो.

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेला अंकित खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. आपल्या उत्तम अभिनयामुळे रामाची भूमिका साकारणारा अंकित सिवाच हा अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. तसेच त्याच्या तगड्या आणि तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे त्याचे चाहते त्याला प्रोत्साहन देत असतात. पण त्याचे चाहते आणि प्रेक्षकांना एक गोष्ट कदाचित ठाऊक नसेल की अंकितने सेटवरच उभारलेल्या आपल्या जिममुळे त्याने आपले शरीर पीळदार बनविले आहे. या मालिकेसाठी त्याला प्रदीर्घ काळ चित्रीकरण करावे लागत असल्याने त्याला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेगळा वेळच मिळत नाही. 

म्हणूनच आता दोन प्रसंगांच्या चित्रीकरणादरम्यान मोकळा वेळ मिळाला की अंकित व्यायाम करतो आणि सेटवरच असलेल्या जिममध्ये वर्कआऊट करतो. इतकेच नाही, तर आपल्या सर्व सहकलाकारांनाही आपल्याप्रमाणे नियमित व्यायाम करण्यास अंकितने भाग पाडले आहे. त्याबरोबर तो आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी कोणता आहार करावा आणि कधी-कसे खावे, याचेही मार्गदर्शन करीत असतो. आपले सहकारी आपल्यासारखेच तंदुरुस्त राहावेत, अशी त्याची इच्छा आहे.

आपल्या या व्यायामाबद्दल आणि नव्या छंदाबद्दल अंकितने सांगितले, “नियमित व्यायामाची मला खूप आवड असून या व्यायामामुळे मी माझ्या शरीरातील ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित करीत असतो. मालिकेच्या प्रदीर्घ चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे मला स्वतंत्रपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य होत नाही. तेव्हा मी सेटवरच एक बनवली आहे. त्यात वेळ मिळेल तेव्हा मी व्यायाम करतो. शिवाय सेटवर उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये मी प्रयोगही करून बघत असतो. उदाहरणार्थ, खुर्चीचा उपयोग मी पुश-अपसाठी करतो, तर एका आडव्या बारला लटकून मी दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करतो. आता माझे सहकलाकारही व्यायाम करू लागले आहेत आणि ते स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहून मला आनंद होतो.”