Join us  

‘बडे अच्छे लगते है’नंतर अंकित नारंग पुन्हा एकदा झळकणार या अभिनेत्रीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:30 AM

‘पवित्र रिश्ता’ आणि ‘दिव्य दृष्टि’यासारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून प्रसिद्धी मिळवणारा अंकित नारंग आता एका वेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

‘पवित्र रिश्ता’ आणि ‘दिव्य दृष्टि’यासारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून प्रसिद्धी मिळवणारा अंकित नारंग आता एका वेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. तो माचिस की डिबिया या लघुपटात अभिनेत्री एकता कौलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अंकित नारंग आणि एकता कौल यांनी यापूर्वी लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते है’मध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकेमुळे त्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. अंकित आणि एकता खूप वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र झळकण्यासाठी उत्साही आहेत. 

या लघुपटातील भूमिकेबद्दल अंकित नारंग म्हणाला, मी माचिस की डिबिया लघुपटातील भूमिकेबाबत खूप उत्साही आहे. मला अपेक्षा आहे की ही भूमिका व लघुपट प्रेक्षकांना खूप आवडेल. या लघुपटाची संकल्पना आजच्या तरूणांच्या मनाशी संबंधीत आहे. या लघुपटाची स्क्रीप्ट पाहून मला वाटतं की हा लघुपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.

अंकित छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत झळकला होता. माचिस की डिबिया या शॉर्ट फिल्मशिवाय अंकित बरीच प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि त्याबद्दल तो लवकरच जाहीर करणार आहे.

टॅग्स :दिव्य दृष्टी