Join us  

'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांना भुरळ, जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 5:37 PM

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी 'ॲनिमल'मधील जमाल कुडु गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातील बॉबी देओलच्या जमाल कुडु गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे. 'ॲनिमल'मधील या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.  ट्रेण्डिंग गाण्यावर रिल व्हिडिओ ते अनेकदा शेअर करतात. आता ऐश्वर्या आणि अविनाश यांनी 'ॲनिमल'मधील जमाल कुडु गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्याबरोबर अविनाश कासारही डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा भन्नाट डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

दरम्यान, 'ॲनिमल' चित्रपटात रणबीरबरोबर बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १५ दिवसांत जगभरात ७८४.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे.  

टॅग्स :बॉबी देओलऐश्वर्या नारकरअविनाश नारकर