... आणि ब्रम्हराक्षसमधील हा अभिनेता परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:52 IST
ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेत ब्रम्हराक्षसची भूमिका पराग त्यागी साकारत होता. पण परागने या मालिकेला रामराम ठोकला. ...
... आणि ब्रम्हराक्षसमधील हा अभिनेता परतला
ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेत ब्रम्हराक्षसची भूमिका पराग त्यागी साकारत होता. पण परागने या मालिकेला रामराम ठोकला. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला सरकारराज या चित्रपटात पराग महत्त्वाच्या भूमिकेत असल्याने त्याने ही मालिका सोडली असल्याचे म्हटले जात होते. पण परागच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. या मालिकेत तो परतणार आहे.परागने ही मालिका सोडल्यानंतर किश्वर मर्चंट या मालिकेत ब्रम्हराक्षसची भूमिका साकारत होती. पण आता या मालिकेतील ओरिजनल ब्रम्हराक्षस परतणार आहे. पराग पुन्हा ब्रम्हक्षसचीच भूमिका साकारणार आहे. याविषयी पराग सांगतो, मी माझ्या रिएंट्रीसाठी खूप उत्सुक आहे. ही मालिका माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण या मालिकेतील माझी भूमिका खूप वेगळी आहे. त्याचसोबत या मालिकेतील माझा लूकदेखील खूप वेगळा आहे. या लुकसाठी मला कित्येक तास कॅमेऱ्यासमोर घालवावे लागत असत. पण तरीही मी हा रोल खूप एन्जॉय केला. मी या मालिकेचा भाग नसल्याने मी या मालिकेचे चित्रीकरण, माझी भूमिका सगळे काही खूप मिस केले. सगळ्यात जास्त मी माझी व्हॅनिटी व्हॅन मिस केली. कारण मेकअप करण्यासाठी मला कित्येक तास तिथेच बसावे लागत असे. मी परत आल्यानंतर मला लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतील याची मला खात्री आहे. परागच्या रिएंट्रीसोबतच या मालिकेत आणखी एक एंट्री होणार आहे. या मालिकेत करण छाब्राची दिसणार असून त्याची ही पहिलीच मालिका आहे.