Join us

'रंग माझा वेगळा' फेम अनघा अतुल दिसणार या प्रोजेक्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:02 IST

Anagha Atul : अनघा अतुल लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री अनघा अतुल (Anagha Atul) घराघरात पोहचली आहे. अनघा अतुलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ती एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. ती प्रशांत दामलेंसोबत नाटकात काम करताना दिसणार आहे.

अनघा अतुल लवकरच एका नवीन नाटकात काम करताना दिसणार आहे. या नाटकाचं नाव आहे शिकायला गेलो एक!. हे नाटक १३ डिसेंबरपासून भेटीला येत आहे. या नाटकात अनघा विद्या सानेच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्या साने हुशार, आज्ञाधारक, स्पष्टवक्ती, कर्तबगार आणि बाबाची परी आहे. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केले आहे. अनघाचे चाहते तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. अनघाने प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मॅनेजर म्हणून काम करत असतानाच ती रंगभूमीवरील प्रायोकिग नाटकांमध्ये देखील काम करत होती. याच दरम्यान तिला रंग माझा वेगळा या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.