कौन बनेगा करोडपती ९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी उडवली अभिषेक बच्चनची टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 17:45 IST
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघे पिता-पुत्र लवकरच प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. ते दोघे कोणत्याही चित्रपटात नव्हे ...
कौन बनेगा करोडपती ९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी उडवली अभिषेक बच्चनची टर
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघे पिता-पुत्र लवकरच प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. ते दोघे कोणत्याही चित्रपटात नव्हे तर छोट्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या कौन बनेगा करोड़पती ९ या रिअॅलिटी शोमध्ये त्या दोघांना एकत्र पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी त्या दोघांनी नुकतेच चित्रीकरण केले. या कार्यक्रमाचा त्यांचा चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता. वडील-मुलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना या कार्यक्रमात नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या एका विशेष भागात गुँज फाऊंडेशनचे संस्थापक अंशू गुप्ता आणि अभिषेक बच्चनला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिषेक या कार्यक्रमात अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेला दिसणार आहे.अभिषेक बच्चन हा फुटबॉल फॅन असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे आणि यावरूनच अमिताभ बच्चन यांनी अभिषेकची चांगलीच टर उडवली. अमिताभ बच्चन यांनी त्याला फुटबॉल या त्याच्या आवडत्या खेळावर एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अभिषेकला थोडा वेळ लागला. तर त्यावर अमिताभ बच्चन यांनी लगेचच त्याची मस्करी करायला सुरुवात केली. अभिषेकला उत्तर द्यायला वेळ लागल्यावर अमिताभ लगेचच म्हणाले, तू दिवसभर फुटबॉलच्या मागे असतो. पण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुला इतका वेळ लागला. अमिताभ यांनी असे म्हणता उपस्थितांना हसू आवरले नाही.अभिषेक फुटबॉलचा खूप मोठा फॅन असल्याने तो क्षणात उत्तर देईल असे अमिताभ बच्चन यांना वाटले होते. परंतु अभिषेक बच्चनला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. त्यामुळे अमिताभ यांनी त्याची टर खेचली. त्यावर अभिषेक देखील काही गप्प बसला नाही. तो लगेचच म्हणाला, मी खूप प्रवास करत असल्याने मला उत्तर देण्यास थोडा वेळ लागला. अभिषेकच्या या उत्तराचे मजेदार मार्गाने अमिताभ यांनी खंडन केले. वडील आपल्या मुलाची टर खेचत आहे हे पाहून सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. प्रेक्षकांसाठी तो क्षण पाहण्याचा अनुभव खूपच चांगला होता. Also Read : अमिताभ बच्चन यांच्या 'या' खास गोष्टीमुळे रेखा व्हायच्या आकर्षित