Join us  

प्रकाश आमटेंच्या लोक बिरादरी प्रकल्पाला बिग बींनी दिली देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 12:13 PM

'कौन बनेगा करोडपती' या शोनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

ठळक मुद्देबिग बींनी 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात २५ लाखांची दिली देणगी

सोनी वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमानंतर बच्चन यांनी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना २५ लाख रुपयांची देणगी दिली. स्वतःच्या देणगीचा त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही, असे प्रकाश आमटेंनी सांगितले.

आमटे दाम्पत्याला मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवाही देत आहेत. त्यांच्या या कार्याला अमिताभ बच्चन यांनी सलाम केला. या कार्यक्रमात त्यांनी २५ लाख रुपये जिंकले. या कार्यक्रमाबाबत आणि अमिताभ बच्चन यांच्या मनाचा मोठेपणा प्रकाश आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितला.

अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी २५ लाखांची देणगी दिली, असे प्रकाश आमटेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी ही देणगी दिली. महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात त्यांनी हे पैसे जमा केलेत. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम दूरवर जाऊन पोहोचले. महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील जनतेपर्यंत हे कार्य पोहोचले. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन