Join us

अमृता पुरीचे मालिकेतील भूमिकेशी आहे हे खास नातं जाणून घ्या कोणतं नातं आहे हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 14:10 IST

'पीओडब्ल्यू- बंदी युध्द के’ ही मालिका हळुहळु रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे उत्कृष्ट कथानक आणि कलाकरांचा सहज सुंदर ...

'पीओडब्ल्यू- बंदी युध्द के’ ही मालिका हळुहळु रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे उत्कृष्ट कथानक आणि कलाकरांचा सहज सुंदर वाटणार उत्तम अभिनय यांमुळे हे कलाकार रसिकांना आवडत आहेत.विशेष म्हणजे अमृता पुरीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. दर्जेदार आणि सहजसुंदर अभिनयाबद्दल अमृताची पुरीला मात्र तिचे  कौतुक होणे इतके महत्त्वाचे वाटत नाहीय.मालिकेला रसिकांची पसंती मिळतेय याचे श्रेय संपूर्ण कलाकरांच्या टीमला आणि मालिकेची बॅकस्टेज काम करणा-या टीमला जाते. कोण्या एका कलाकाराचे हे श्रेय नाहीय. यातील प्रत्येक कलाकराचे पडद्यावर साकार करीत असलेल्या व्यक्तिरेखेशी वैयक्तिक नाते जुळले आहे.त्या भूमिकेशी जुळलेल्या भावना तिच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.अमृता मालिकेत सरताजसिंह या युध्दकैद्याची पत्नी हरलीन कौरची व्यक्तिरेखा साकारतेय. अमृतासाठी ही एक भूमिका इतक्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून तिच्या आजोबांचे बंधू हे भारतीय लष्करात होते आणि चीनबरोबरच्या युध्दात त्यांना तिबेटमध्ये सहा महिने चीनचे युध्दकैदी म्हणून राहावे लगले होते. त्याविषयी अमृता म्हणाली, “एके रात्री मी कुटुंबियांबरोबर जेवत असताना मला या घटनेची माहिती मिळाली. इतक्या वर्षांनंतरही त्याघटनेची आठवण काढताना त्यांच्या पत्नीच्या डोळ्य़ांतून अश्रू वाहात होते. सहा महिने त्यांना त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. ज्या बॅकपॅकने त्यांचे बुलेटपासून रक्षण केले ती आमच्या देवघरात देवांच्या बरोबर ठेवलेली आहे. हा खूप संवेदनशील विषय असून मला माझ्या अभिनयासाठी त्याचा वापर करण्याची इच्छा नव्हती.मी या व्यक्तिरेखेच्या भावना अचूकपणे व्यक्त केल्या असाव्यात, इतकीच मला अपेक्षा आहे.”या मालिकेनंतर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची वेदना प्रेक्षक समजून घेतील आणि त्यांच्या ख-या भावनांचा आविष्कार करतील, अशी आम्ही आशा करतो.