Join us

अजय सगळ्यांना करणार सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:25 IST

सावधान इंडिया या कार्यक्रमाचा नुकताच नवा सिझन सुरू झाला असून या सिझनध्ये पूर्वीच्या सिझनपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. ...

सावधान इंडिया या कार्यक्रमाचा नुकताच नवा सिझन सुरू झाला असून या सिझनध्ये पूर्वीच्या सिझनपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाद्वारे समाजात होत असलेल्या गुन्ह्यांपासून सावधान राहाण्यासाठी एक संदेश देण्यात येणार आहे. हा सिझन खूप खास असल्याने आता या कार्यक्रमाच्या काही भागांचे सूत्रसंचालन अजय देवगण करणार आहे. अजय सध्या शिवाय या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो आता सावधान इंडियाच्या नवीन सिझनचेदेखील प्रमोशन करणार आहे. डर के नही, दट कर अशी या नव्या सिझनची टॅगलाइन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी अजय खूप उत्सुक आहे. तो सांगतो, "या सिझनद्वारे न घाबरता कोणत्याही समस्येला सामोरे जा... हा संदेश प्रेक्षकांना दिला जाणार आहे. याचा त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल अशी मला आशा आहे."