उर्मिला-आदिनाथची हवाई सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 00:54 IST
आकाशात उडणाºया विमानाकडे पाहुन प्रत्येकालाच असे वाटते की आपणही एकदा विमानात बसुन हवाई सफर ...
उर्मिला-आदिनाथची हवाई सफर
आकाशात उडणाºया विमानाकडे पाहुन प्रत्येकालाच असे वाटते की आपणही एकदा विमानात बसुन हवाई सफर करावी. परंतू मराठी इंडस्ट्रीतील रोमँटिक कपल आदिनाथ अन उर्मिला यांनी तर एक पाऊल पुढे जात चक्क विमानच उडविले आहे. त्याचे झाले असे कि दोघेही नूकतेच हॉलिडे एंजॉय करायला न्युझीलंडला गेले होते. तिथे त्यांनी अनेक अॅडव्हेंचरस गोष्टी केल्या अन प्लेन उडवायचे स्वप्न देखील साकारले. त्यांच्या लाईम मधील तो अमेझींग एक्सपीरियन्स आदिनाथने सीएनएक्सशी शेअर केला. आदिनाथ म्हणतोय, आमच्या दोघांचाही तो प्लेन उडविण्याचा अनुभव एकदमच भारी होता. जेव्हा माझ्या हातात प्लेनचा हँडल आला आणि मला तो खेचुन प्लेन टेक आॅफ करायला लागले तो सगळा अनुभव मी शब्दात सांगुच शकत नाही. जेव्हा प्लेन आकाशात उडाले अन न्युझीलंडचा तो सगळा नजारा वरुन पाहताना आपण स्वप्नात आहोत कि काय असेच वाटले इतके सुंदर ते दृष्य होते. प्लेन लँड केले तेव्हा असे वाटले कि खरच आपण काहीतरी अमेझींग अन अनफगर्ॉटेबल केले आहे. या मेमरिज कायम लक्षात राहतील. सिनेमामध्ये अनेकवेळा अशाप्रकारचे सीन्स कलाकारांना करावे लागतात. परंतू उर्मिला अन आदिनाथने या गोष्टींचा रिअल लाईफ मध्ये एक्सपीरियन्स घेतल्याने रिल लाईफ मध्ये हे दोघे नक्कीच एकदम कॉन्फिडन्टली विमान उडवतील यात शंका नाही.