Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते' आणि 'मुलगी झाली हो'च्या कलाकारांचा 'आता होऊ दे धिंगाणा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:19 IST

Aata Hou De Dhingana : 'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर पहिल्यांदाच ‘मुलगी झाली हो’च्या माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये.

मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे. माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. आता होऊ दे धिंगाणामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे.

ढोल ताश्यांच्या गजरात माऊची एण्ट्री होणार आहे. खरेतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह