Join us

पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हिमानी शिवपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 16:54 IST

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा हिमानी शिवपुरीचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘एक विवाह ऐसा भी’ या मालिकेत हिमानी सासूच्या ...

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा हिमानी शिवपुरीचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘एक विवाह ऐसा भी’ या मालिकेत हिमानी सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘विषकन्या- एक अनोखी प्रेम कहानी’ या मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यानंतर काही दिवसांसाठी त्यांनी ब्रेक घेतला. चांगल्या आॅफर्स मिळाल्यास पुन्हा एकदा त्याच उत्साहात कमबॅक करू असेही त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच ‘एक विवाह ऐसा भी’ या मालिकेविषयी विचारण्यात आले. मालिेकत असलेली भूमिका आवडली, मालिकेचे कथानकही चांगले वाटले.त्यामुळे लगेचच होकार कळवला असे हिमानी शिवपुरी यांनी सांगितले. मालिकेचे कथानक आजच्या पिढीला साजेसे असेच अाहे. मालिकेत  हिमानी शिवपुरीसह अभिषेक मलिक आणि रोहित सुचाती कलाकार असणार आहेत. हिमानी या सोनाली निकमच्या सासूची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हिमानी यांना पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असणार हे मात्र नक्की.