Join us  

श्रेयस तळपदे पाठोपाठ आणखी एक बॉलिवूड अभिनेता झळकणार मराठी मालिकेत, लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 2:02 PM

गेले अनेक वर्षे बॉलीवुडच्या गर्दीत हरवलेले कलाकारांनाही छोटा पडदा खुनावतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून श्रेयस तळपदेने टीव्हीवर कमबॅक केले.

सध्या छोट्या पडद्यावर नावाजलेले कलाकार छोट्या पडद्यावर झळकत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. हिंदी सिनेमातल्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आता आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे.  गेले अनेक वर्षे बॉलीवुडच्या गर्दीत हरवलेले कलाकारांनाही छोटा पडदा खुनावतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून श्रेयस तळपदेने टीव्हीवर कमबॅक केले. हिंदी सिनेमात रुळलेला श्रेयसला पुन्हा एकदा मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला.

श्रेयस तळपदे मालिकेत झळकणार म्हटल्यावर चाहत्यांनाही त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता होती. अखेर तो टीव्हीवर झळकला आणि मालिकेलाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्रेयस पाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मालिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे. लयभारी अभिनेता रितेश देशमुख. 

रितेश देशमुखसुद्धा आता मालिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. रुपेरी पडदा गाजवणारा रितेश देशमुख आता छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाल्याच्या चर्चा आहेत. बॉलिवूडमध्ये रुळलेला रितेशला टीव्हीवर पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी मनोरंजनाची ट्रीटच असणार हे मात्र नक्की. रितेशसाठी टीव्हीवर काम करणे काही नवीन नाही.

 

2016 मध्ये रितेश देशमुख “विकता का उत्तर” या शोचं सूत्रसंचालन करताना झळकला होता. आता रितेश देशमुख झळकत असलेल्या मालिकेत कोणाची अभिनेत्री म्हणून वर्णी लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तुर्तास याबाबतची अधिकृता घोषणा अजून करण्यात आलेली नसून लवकरच करण्यात येणार असल्याचे समजतंय.

रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. पत्नी जेनिलियासोबत व्हिडीओ फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. रितेश आणि जेनिलाय दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरते. त्यांच्या प्रत्येक घडामोडी पाहून चाहते तितकाच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.

 

रितेश देशमुखसोबत लग्न झाल्यापासून जेनिलायाचाही मराठी बाणा पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात. इतकंच काय तर रितेश जेनिलाने दोन्ही मुलंही मराठी भाषेतच बोलतात.अनेकदा मीडियाचे कॅमेरे दिसताच आदराने नमस्कार करताना मुलांची फोटोही एरव्ही व्हायरल झाली आहेत. 

 

टॅग्स :श्रेयस तळपदेरितेश देशमुख