Join us  

अदनान सामीच्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा झाला ह्या सेटवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 12:22 PM

स्टार प्लसवरील 'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक बनलेल्या नामवंत गायक अदनान सामी याला कार्यक्रमाच्या टीमने एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देअदनानच्या लग्नाचा हा वाढदिवस हा एक संस्मरणीय प्रसंग ठरला'द व्हॉइस' शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लसवरील द व्हॉइस या कार्यक्रमात एक प्रशिक्षक बनलेल्या नामवंत गायक अदनान सामी याला कार्यक्रमाच्या टीमने एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. त्या दिवशी अदनानच्या लग्नाचा नववा वाढदिवस असूनही तो कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी आला होता. तेव्हा त्याच्या लग्नाचा हा वाढदिवस साजरा करण्याची जबाबदारी या टीमने उचलली.

या टीमच्या एका सूत्राने सांगितले, “त्यादिवशी अदनान सामीच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता, तरीही तो ‘द व्हॉइस’च्या चित्रीकरणासाठी सेटवर आला. ही गोष्ट या टीमच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा वाढदिवस सेटवरच साजरा करण्याची योजना आखली. त्यांनी अदनानसाठी एक खास केक मागविला आणि अदनानची मुलगी आणि पत्नी यांच्या उपस्थितीत तो कापला. यावेळी हर्षदीप कौर, कनिका कपूर आणि अरमान मलिक हे तीन प्रशिक्षकही या सोहळ्यातसहभागी झाले आणि सर्वांनी मिळून धमाल केली.”

‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या सेटवर पार पडलेला अदनानच्या लग्नाचा हा वाढदिवस हा एक संस्मरणीय प्रसंग ठरला. नामवंत गायक-संगीतकार हे प्रशिक्षक म्हणून, तर ए. आर. रेहमान यांच्यासारखे महान संगीतकार हे सुपरगुरू म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्याने प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ३ फेब्रुवारीला शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता द व्हॉइस शो फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :द व्हॉइस शो