सलमान खानला भावला अदनान हुसैनचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 17:30 IST
सा रे ग म प लिटल चॅम्प्समध्ये नुकताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान हे ह्या ...
सलमान खानला भावला अदनान हुसैनचा आवाज
सा रे ग म प लिटल चॅम्प्समध्ये नुकताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान हे ह्या शोमध्ये सेलेब्रिटी जज म्हणून उपस्थिती लावली होती. आपल्या ट्यूबलाईट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते या मंचावर आले होते. एका मागोमाग एक अशा टॉप ८ स्पर्धकांनी जबरदस्त परफॉर्मन्सेस दिले. या लिटल चॅम्प्सचे परफॉर्मन्सेस पाहुन सलमान चकित झाला. मुंबईचा लिटल चॅम्प अदनान हुसैनने सलमानच्या सुल्तान चित्रपटातील जग घुमियां हे गाणे सादर करत सलमान खानचे मनं जिंकले. त्याच्या परफॉर्मन्स सुरू व्हायच्या आधी दबंग अभिनेता सलमानने अदनानला जोवद यांना सांगताना ऐकले होते की त्याची तब्येत ठीक नाहीये, त्याचा घसा दुखतोय आणि त्याला चक्करही येतेय. ते ऐकताच सलमानने आपल्या ड्रायव्हरला आपल्या गाडीतून आयुर्वेदिक औषध आणायला पाठवले आणि त्यामुळे अदनानला लगेच बरेही वाटले. सुपरस्टारने आपल्यासाठी हे केले हे पाहून अदनानला खूपच छान वाटले. अदनानच्या आवाजाने प्रभावित झालेला सलमान म्हणाला, “अदनान, तू तर राहत फतेह अली खानपेक्षाही हे गाणे छान गायलास.” सलमाननी केलेल्या कौतुकामुळे अदनानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सलमानने यावेळी परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि जावेद अली यांच्याशी मस्त गप्पा मारल्या. दिवसेंदिवस या स्पर्धेतील रंगत वाढत चाललीय आहे. ही स्पर्धा आता मतदानाच्या टप्प्यात गेली असून त्यासाठी ‘गूगल’च्या मदतीने व्हिडिओ मतदानाचे तंत्रज्ञान आशियात प्रथमच सादर केले आहे. यामुळे मतदानापूर्वी प्रेक्षक ‘गूगल’वर प्रत्येक स्पर्धकाच्या कामगिरीची छोटीशी दृक्-श्राव्य झलक पाहू शकतील. यामुळे त्यांना योग्य पध्दतीने मतदान करण्यासाठी मदत मिळेल.