Join us  

'या' बोल्ड अभिनेत्रीचे साडीत खुललं सौंदर्य, फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 6:30 AM

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच  सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.

तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते. नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते. स्कुबा डायविंगच्या कोर्सनंतर रसिकाला व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचेही प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि ती लवकरच घेणार असल्याचे ती सांगते.

टॅग्स :रसिका सुनिल