Join us  

'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिरजच्या लग्नात 'या' अभिनेत्रीची असणार खास हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 5:56 PM

'अजुनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिरज अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा पाहणे रंजक असणार आहे.

'अजुनही बरसात आहे' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.मालिकेत डॉ. मीरा आणि डॉ. आदिराजची लव्हस्टोरी रंगते आहे. त्यामुळेट मालिका दिवसेंदिवस रसिकांना भावते आहे. डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हे दोघांनी आता लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर सध्या दोघांचेही पारंपरिक अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत. यात आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. 

दोघांच्या फोटोमध्ये आणकी एका अभिनेत्रीचा पाठमोरा फोटो व्हायरल होत आहे. पाठमोरा फोटो असल्यामुळे नेमकी ती कोण असा चाहते तर्कवितर्क लावताना दिसत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे. अभिनेता उमेश कामतची पत्नी प्रिया बापट. तर या ऑनस्क्रीन रंगणा-या लग्नात प्रिया बापटची हजेरी लावणार आहे. आता तिच्या एंट्रीने मालिकेत काही ट्विस्ट दडला आहे का ? यावरही चर्चा सुरु आहेत. मात्र लग्नात तिच्या एंट्रीने विलक्षण वळण पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

 

तुर्तास प्रेक्षकांना ही प्रेमकहाणी आवडते आहे आणि ते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, त्या मीरा आणि आदिराज यांचं लग्न लवकरच पार पडणार आहे. अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. २४ नोव्हेंबरपासून #Adira यांचा विवाहसप्ताह सुरू होणार असून प्रेक्षकांना मीरा आणि आदिराज यांच्या लग्नसमारंभातले क्षण, अर्थातच मेहंदी, संगीत, हळद हे सगळं अनुभवता येणार आहे.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत