Join us  

समुद्र किनारी पूजा सावंतने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 7:00 AM

Pooja Sawant looks stunning white dress : लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे.

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर'मध्ये परीक्षकाची भूमिका साकारते आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. पूजाने अलीकडेच तिचे समुद्र किनाऱ्यावरचे फोटोशूट शेअर केलं आहे. व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा खूपच ग्लॅमरस दिसतेय. पूजा या फोटोत वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. आतापर्यंत तिच्या या फोटोला 62 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने महिला माहूताची भूमिका साकारली होती.

टॅग्स :पूजा सावंत