Join us  

अभिनेत्री हृता दुर्गुळेला मिळाला हा पुरस्कार, या शब्दांत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:23 PM

मालिका आणि नाटक विश्वातील तिच्या अभिनयाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत असते.

'फुलपाखरू' या मालिकेतील  अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला 'युवा तेजस्वी चेहरा' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या विश्वात सुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे. मालिका आणि नाटक विश्वातील तिच्या अभिनयाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत असते. या अभिनेत्रीचा सन्मान 'झी युवा सन्मान' सोहळ्यात करण्यात आला.

या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कार देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. सारंग गोसावी यांना 'सामाजिक जाणीव सन्मान', अक्षय बोरकर यांना 'उद्योजक सन्मान', सारंग नेरकर यांना 'संशोधक सन्मान' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

याशिवाय 'कला सन्मान'चा मान अभिनेता आदिनाथ कोठारे याला, 'संगीत सन्मान'चा मान गुणी गायक जसराज जोशी याला, 'डिजिटल कला सन्मान' हा पुरस्कार सारंग साठ्ये याला मिळाला. 'युवा साहित्य सन्मान' पुरस्काराचा मान मनस्विनी लता रवींद्र हिला मिळाला तर, डॉ. आरती बंग यांना 'युवा संजीवनी सन्मान' व 'एनडीआरएफ'ला 'युवा अलौकिक योगदान सन्मान' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेझी मराठीझी युवा