Join us  

नवऱ्याला ‘आजोबा’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 12:01 PM

सध्या या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. ऐश्वर्या-अविनाश या जोडीकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ऐन साठीतही ऐश्वर्या आणि अविनाश त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. अनेकवेळा दोघे रिल्स आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

अशाच एक व्हिडीओमुळे त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्यक्तिने त्यांच्या व्हिडीओ नेगेटीव्ह कमेंट केलीय. पण ऐश्वर्या नारकर यांनी त्याला सोडतोड उत्तर दिलं आहे. 

अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही पारंपारिक अंदाजात दिसातयेत. यात अविनाश नारकर यांनी पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलं होतं तर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. नेटकऱ्यांनी या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मात्र काहींनी त्यांना ट्रोल केलंय. एका ट्रोलरने अविनाश नाकरकर यांच्यावर कमेंट करत लिहिले, ''नमस्कार आजोबा''.  'काय म्हणता पणजोबा?'. ऐश्वर्या यांच्या या कमेंटवर बरेच लाईक आले आहेत. त्याचबरोबर नेटकऱ्यांनीही हसण्याचे इमोजी शेअर करत कमेंट केले आहे.  

दरम्यान, ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर अविनाश नारकर ‘फकाट’ सिनेमात दिसले होते.

 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकर