Join us

'जय जय शनिदेव' मालिकेत अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 18:49 IST

Jai Jai Shani Dev : सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'जय जय शनिदेव' ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'जय जय शनिदेव' (Jai Jai Shani Dev ) ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून 'शनिदेव' ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. 

संकेत खेडकर हा मूळचा अहमदनगरचा असून 'जय जय शनिदेव' मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवस आधी 'जय जय शनिदेव' मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.

 शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे 'जय जय शनिदेव' मालिका ८ मेपासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सोनी मराठी