Join us

​या अभिनेत्याने मालिकांचे लेखनदेखील केले आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 14:09 IST

लेखनानंतर अभिनयाकडे वळणारे अनेकजण आपल्याला मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. मराठीत तर अनेक चांगले लेखक हे चांगले अभिनेतेदेखील ...

लेखनानंतर अभिनयाकडे वळणारे अनेकजण आपल्याला मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. मराठीत तर अनेक चांगले लेखक हे चांगले अभिनेतेदेखील आहेत. चिन्मय मांडलेकर, प्रल्हाद कुडतरकर यांनी आपल्या अभिनयातून हे सिद्ध करून दाखवले आहे. हिंदीतदेखील काही लेखकांनी अभिनयात आपले भाग्य आजमावले असून त्यात त्यांना यशदेखील मिळाले आहे.वारिस या मालिकेत जगनची भूमिका साकारत असलेला अक्षय डोगरा हा पूर्वी लेखक होता असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. अक्षय हा एक खूप चांगला लेखक असून त्याने अनेक पुस्तकेदेखील लिहिली आहेत. एवढेच नाही तर एका मालिकेचे त्याने लेखनदेखील केले आहे. सना खान, अपूर्वा अग्निहोत्री यांची प्रमुख भूमिका असलेल्या सौभाग्यलक्ष्मी या मालिकेचे त्याने लेखन केले होते. अक्षय हा खूप चांगला लेखक असला तरी तो अभिनय करत असलेल्या वारिस या मालिकेचे लेखन करण्याचा काहीही विचार केला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. या मालिकेची कथा एका सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारी आहे. त्यामुळे या मालिकेच्या कथेला दिली जाणारी वळणे ही खूपच वेगळी आहेत. त्यामुळे ही मालिका लिहिण्याचा मी विचारदेखील करू शकत नाही असे अक्षयचे म्हणणे आहे. या मालिकेचे लेखक हे खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याचा माझा काहीही विचार नाहीये असेही अक्षय सांगतो.