Join us

थपकीच्या सेटवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 11:27 IST

थपकी प्यार की या मालिकेच्या सेटवर नुकताच एक मोठा अपघात झाला. या सेटवर नुकतेच चित्रीकरण सुरू असताना एका तंत्रज्ञानाला ...

थपकी प्यार की या मालिकेच्या सेटवर नुकताच एक मोठा अपघात झाला. या सेटवर नुकतेच चित्रीकरण सुरू असताना एका तंत्रज्ञानाला वीजेचा जोरात धक्का बसला. यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची तब्येत सुधारत आहे. इतका मोठा अपघात होऊनही सुदैवाने कोणाला जास्त दुखापत झाली नाही यासाठी आम्ही देवाचे आभारी आहोत असे मालिकेच्या टीममधील मंडळींचे म्हणणे आहे.