Join us

आर्त चा आवाज लोकसभेपर्यंत पोहोचणार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:37 IST

         आर्त या मराठी चित्रपटातून एका देशव्यापी आदिवासी जात पंचायत रूढी परंपरेबाबत भाष्य करण्यात आले आहे. ...

         आर्त या मराठी चित्रपटातून एका देशव्यापी आदिवासी जात पंचायत रूढी परंपरेबाबत भाष्य करण्यात आले आहे. नुकताच या चित्रपटाला कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. शीतल साळुंके, संतोष मयेकर, गणेश यादव, जयराज नायर आणि अजित भगत यात प्रमुख भूमिकेत आहेत, याबाबत दिग्दर्शक राजेंद्र साळी याबाबत सांगतात की, गेली दिड ते दोन वर्ष मी महाराष्ट्र (कसारा, कर्जत, नंदुरबार). गुजराथ, कर्नाटक च्या ग्रामीण भागाचा सखोल अभ्यास केला तेव्हा माज्या लक्षात आले की. आज भारतात महानगरांमध्ये महिला प्रगतीपथावर दिसते आहे, परंतु ग्रामीण भारतात आजही तिला जात पंचायत रूढी मुळे अन्याय सहन करावा लागतो आहे, इतक्या जाचक आणि र्ह्द्यद्रावक शिक्षा मी तिकडे ऐकल्या आहेत की, त्या कल्पनेने देखील अंगावर शहारे येतात. आमच्या ह्लआर्तह्व चित्रपटातून अशाच महिलेंचा आतला आवाज मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, नुकतेच लोकसभेत सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा (जात पंचायतच्या जाचक रूढी विरोधात) निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचे आम्ही समर्थन करत आहोत. लवकरच या चित्रपटाचा विशेष खेळ (इंग्रजी सबटायटल सह) आम्ही विशेष लोकसभा सदस्यांसाठी आयोजित करणार आहोत, जेणे करून आर्तचा आवाज लोकसभेपर्यंत पोहचू शकेल.