Join us  

Aai Kuthe Kay Karte : '...म्हणून मी निर्धास्तपणं काम करू शकते'; अरुंधतीची इंस्टाग्रामवरील पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 7:08 PM

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)मधील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.  

अरूंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इंस्टाग्रामवर कोलाजमध्ये बऱ्याच जणांचे फोटो शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज आई कुठे काय करते या दैनंदिन मालिकेत पाहता... पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालूच असतो. जसे अरुंधतीच्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात. गेले २ वर्ष मी ही मालिका करतेय. शूट मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात...! स्वरालीला मी खूप खूप दिवस भेटत नाही, तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते... कधीकधी मी २० /२० दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना ही सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते... पण तिची काळजी अशी नसते कारण प्रमोद त्याचे व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळे करतो पण ह्यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या सपोर्ट स्टाफचा.

तिने पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, स्वरालीला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे ( तिची शाळा व्यवस्थित ऑफ लाइन सुरू आहे ... त्याबद्दल नंतर लिहीन) , तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे , तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे , तिच्या इतर एक्टिव्हिटीसाठी पाठवणे.… ही सगळी आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्त काम ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते. आपण भरतकामाची नक्षी पाहतो आणि त्याचं कौतुक करतो पण मागच्या बाजूला वेगळी वीण असते, अनेक टाके आणि गाठीही असतात त्या आधारावर ते नक्षीकाम उभं असतं. प्रमोद आहे , माझी आईही असते त्याच बरोबर हा इतका प्रेमळ आणि खंबीर स्टाफ आहे म्हणून अरुंधती आहे.विजय, अमोल, अनिता, ज्योती, अनुराधा, आशा, ऋतुजा, अमृता....तुम्हाला भरभरून प्रेम.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका