Join us  

TRP च्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची पिछेहाट; तर 'ही' मालिका ठरली नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 3:01 PM

TRP Ratings : टॉप १० मालिकांमध्ये या आठवड्यात शेवटच्या १० व्या नंबरवर आहे लग्नाची बेडी मालिका. तर नेहमी पहिलं स्थान पटकावणारी मालिका आई कुठे काय करतेदेखील मागे पडली आहे.

मराठी मालिकांमध्ये सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांची प्रेक्षकांमध्ये जास्त क्रेझ आहे. मालिकांमध्ये अनेकदा वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात आणि यावरुनच त्यांचा टीआरपी देखील वर-खाली होत असतो. या आठवड्याच्या टीआरपीने तर कमालच केली आहे. टॉप १० मध्ये लग्नाची बेडी या मालिकेनं दहावं स्थान पटकावलं आहे तर ठरलं तर मग ही मालिका नंबर वन ठरली आहे. 

टॉप १० मालिकांमध्ये या आठवड्यात शेवटच्या १० व्या नंबरवर आहे लग्नाची बेडी मालिका. या मालिकेला ४.२ रेटिंग मिळाले आहे नवव्या नंबरवर अबोली ही मालिका आहे. या मालिकेला ४.८ एवढं रेटिंग मिळाले आहे. ५.२ रेटिंग मिळवत ८व्या नंबरवर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका तर ५.३ रेटिंग मिळवत स्वाभिमान मालिकेने सातवा नंबर पटकवलाय. या दोन्ही मालिकांच्या टीआरपीमध्ये फारसा फरक नाही आहे. प्रेक्षकांमध्ये हिट असलेली जोडी शशांक आणि अप्पू यांची ठिपक्यांची रांगोळी ही मालिका ६च्या रेटिंगमुळे सहाव्या नंबरवर आहे. तर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला सध्याच्या ट्रॅकमुळे ६.३ एवढं रेटिंग मिळाल्याने ही मालिका पाचव्या नंबरवर आहे. 

कित्येक महिने नंबर एक वर असलेली रंग माझा वेगळा या मालिकेने लीप घेतल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची कमी पसंती दिसून आली आहे. ६.५ रेटिंग मिळवत ही मालिका थेट चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तर टॉप ३ मालिकांमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं, आई कुठे काय करते आणि ठरलं तर मग या मालिका आहेत. या तिन्ही मालिकांमध्ये या आठवड्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळाली. ६.६ रेटिंग मिळवत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तिसऱ्या नंबरवर आहे. 

आई कुठे काय करते ही मालिका घराघरात पाहिली जाते. या मालिकेचे प्रेक्षकांमध्ये खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे. मात्र यावेळी या मालिकेला टक्कर दिलीय ती ठरलं तर मग या मालिकेने. आई कुठे काय करते या मालिकेला ६.८ तर ठरलं तर मग या मालिकेला ६.९ असं रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे थोड्याशा फरकाने ठरलं तर मग या मालिकेने पहिला नंबर पटकावलाय. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना भूरळ पाडते आहे. 
टॅग्स :टीआरपीआई कुठे काय करते मालिका