Join us  

अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात धक्कादाक ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 12:05 PM

‘आई कुठे काय करते’ ही मालिकेत अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात आलेला दुरावा यातून पुरती खचली असली तरी आपल्या सर्व जबाबदाऱ्या तिने चोख पार पाडल्या आहेत.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर  कसोटीच्या या प्रसंगांना अरुंधती ताकदीनीशी सामोरी जाते. मालिकेत घडणा-या घडामोडी आणि मालिकेतील पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालिकेचा यापुढील प्रवास तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे.  

अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात आलेला दुरावा यातून पुरती खचली असली तरी आपल्या सर्व जबाबदाऱ्या तिने चोख पार पाडल्या आहेत. मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात अरुंधतीने कोणतीही कसर राहू दिली नाही. मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये देखिल अरुंधती त्यांना मोलाची साथ देताना दिसली.  

मालिकेत धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे.अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोट घेणार यानंतर अनेक घडामोडी घडल्या. इतक्या दिवसांपासून दोघांच्या नात्याला आता पुर्ण विराम लागणार आहे.  अनिरूद्ध-अरुंधतीचा घटस्फोट होणार असून त्यानंतर मालिकेत काय काय घडणार लवकरच सगळ्या गोष्टींचा उलडा येत्या एपिसोडमध्ये उलगडणार आहे.

 

अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करताना दिसली अखेर अनिरुध्दने घेतलेल्या निर्णयानुसार जन्मोजन्मीच्या नातेही संपणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका