Join us

आस्ताद म्हणतोय... हिंदी नको रे बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 15:35 IST

         चित्रपट अन मालिंकामधुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून घराघरात पोहचलेला अभिनेता अस्ताद काळे म्हणतोय सध्यातरी हिंदी ...

         चित्रपट अन मालिंकामधुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून घराघरात पोहचलेला अभिनेता अस्ताद काळे म्हणतोय सध्यातरी हिंदी मालिका अन चित्रपट नकोत. आता असे काय झालेय कि अस्तादला हिंदीत जायचे नाही. यासंदर्भात सीएनएक्स सोबत बोलताना अस्ताद म्हणतोय मी आत्तापर्यंत चित्रपट अन १८ मालिकांमध्ये चांगले काम केले आहे. माझ्या वाट्याला मराठीमध्ये चांगल्या भुमिका आल्या आहेत अन चांगल्या भुमिका मला यापुढे देखील करायच्या आहेत. नोकराच्या किंवा ड्रायव्हरच्या भुमिकेमध्ये अडकायचे नाही. तर दर्जेदार अभिनयातून प्रेक्षकांसमोर येऊन त्यांचे मनोरंजन करायचे आहे. आजच्या मालिका या स्त्रीप्रधान जरी असल्यातरी सध्या पुरुषांना त्यामध्ये तितकाच महत्वाचा रोल असतो. उगाचच दाखवायचे म्हणुन एक दोन सीन मध्ये दाखविले जात नाही. एका नाटकाच्या तालमीवेळी आम्ही प्रशांत दामले यांच्याशी बोलत असताना मी सहज त्यांना विचारले कि तुम्हाला हिंदीत जायचे नाही का. तर त्यांनी सांगितले मी आज मराठीत ड्रायव्हरच्या सीट वर बसलो आहे तर उगाचच कंडक्टर बनायला का जाऊ. त्यांच्या या वाक्यामुळे आम्ही खरच इन्पायर झालो. आणि हे खरच आहे. हिंदीत जाऊन दुय्यम रोल करण्यापेक्षा मराठीमध्ये चांगल्या दर्जेदार भुमिका मला करायच्या आहेत.