Join us  

'अबोली' मालिकेत नवा ट्विस्ट, या मराठमोळ्या अभिनेत्रीची होणार रिएंट्री; जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:33 AM

Aboli : 'अबोली' मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे, वकिलाच्या भूमिकेत या अभिनेत्रीची रिएंट्री होणपा आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

स्टार प्रवाहवरील 'अबोली' (Aboli) मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. यात अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारतेय. तर अभिनेता सचित पाटील इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारतोय. लवकर मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सोहमचा खून झालाय आणि अंकुश याचा तपास करतोय. अंकुशला संशय अबोलीवर येतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात सोहमच्या खुनाच्या आरोपखाली अंकुश अबोलीला अटक करणार आहे. तिची वकिलाच्या भूमिकेत अभिनेत्रीची रिएंट्री होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता  वाढली आहे.

या आधीही तिने अबोलीमध्ये  विजया राजाध्यक्ष ही  वकिलाच्या भूमिका साकारली होती.  मध्यंतरी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण आता ती पुन्हा मालिकेत त्याच वकिलाच्या भूमिकेत परतणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून रेशम टिपणीस आहे. होय, मालिकेत लवकरच रेशमची रिएंट्री होणार आहे.

रेशम टिपणीसने हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. रेशम 'बिग बॉस' मराठी रिएलिटी शोमुळे चर्चेत आली. या शोमधील तिचा बोल्ड, बिनधास्त व फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. रेशम जीवनातील कुठलीगी खासगी गोष्ट असो किंवा मग भूमिका तिला जे आवडते ते करते. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

टॅग्स :रेशम टिपणीसटिव्ही कलाकारसेलिब्रिटी