Join us

2000 भाग झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:52 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतीच आठ वर्षं पूर्ण केली आणि आता या मालिकेचे 2000 भाग पूर्ण ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतीच आठ वर्षं पूर्ण केली आणि आता या मालिकेचे 2000 भाग पूर्ण होणार आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेचे इतके भाग पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही मालिका प्रेक्षकांची गेल्या अनेक वर्षांपासून आवडती मालिका आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी सांगते, आज प्रेक्षक मला दयाबेन म्हणूनच ओळखतात. ही भूमिका माझ्या आयुष्याचा एक घटक बनली आहे. आम्ही दिवसातील 12 तास तरी सेटवरच असतो. त्यामुळे या मालिकेचा सेट हे आमचे दुसरे घर झाले असून या मालिकेची संपूर्ण टीम हे आमचे कुटुंब बनले आहे.