Join us

तेजस्विनी लवकरच काढणार टॅटू

By admin | Updated: September 10, 2016 02:09 IST

नवीन टॅटू काढण्याचा अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा सध्या विचार सुरू आहे.

टॅटू काढण्याची क्रेझ आणि हौस सध्या सगळीकडेच पाहायला मिळतेय. आपण अनेक कलाकारांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू पाहिले आहेत. दीपिका, प्रियांका चोप्रा यांचे टॅटू तर बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनले होते. पूर्वी चित्रीकरणासाठी टॅटू लपवणे हे खूप कठीण जात असे. पण आता मेकअपमुळे टॅटू झाकता येतो. बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनादेखील टॅटूची भुरळ पडली आहे. नवीन टॅटू काढण्याचा अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा सध्या विचार सुरू आहे. तेजस्विनीच्या बोटावर आणि पायावर आधीच टॅटू आहेत. बाबा असे नाव तिने बोटावर गोंदवून घेतले आहे तर नवऱ्याला बर्थडे गिफ्ट म्हणून दुसरा टॅटू तिने काढला आहे. यावरूनच आपल्याला समजते की, तेजस्विनीला टॅटूची किती आवड आहे. आता तेजस्विनी पुन्हा एकदा टॅटू काढण्यासाठी सज्ज झाली आहे. तो टॅटू ती कुठे काढणार आणि तो कशाप्रकारचा असेल हे तरी अजून गुलदस्त्यातच आहे.