Join us

टशन शुटिंगच्या वेळी प्रेमात पडले

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

बॉलीवूडमध्ये बेबो या टोपण नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर-खान हल्लीच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘सिंघम र्टिन्स’ सिनेमामुळे चर्चेत होती.

पूजा सामंत 
बॉलीवूडमध्ये बेबो या टोपण नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर-खान हल्लीच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘सिंघम र्टिन्स’ सिनेमामुळे चर्चेत होती. मोजून-मापून सिनेमे करणा:या बेबोचा पुढील सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘गोलमाल-4’ 2क्15मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, बेबो जाहिरात-ब्रॅण्डस्च्या जगात मोठं नाव आहे. आज मुंबईत कोंडय़ाचा प्रादुर्भाव रोखणा:या जागतिक  ब्रॅण्ड असलेल्या श्ॉम्पूच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बेबोशी भेट झाली. नेहमीसारखी ग्लॅमरस आणि सुंदर दिसणा:या बेबोने आरंभीच सदर श्ॉम्पूची प्रशंसा करीत म्हटलं, माङया आईनेही हाच श्ॉम्पू तिच्या काळात वापरला होता. त्यामुळे तिच्या अनुभवानंतर जेव्हा सैफ आणि मला या ब्रॅण्ड एन्डोर्समेन्टची विचारणा झाली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आम्ही दोघांनी होकार दिला.
करीनाने यादरम्यान काही व्यक्तिगत आठवणींना उजाळा दिला. सैफ आणि मी ‘टशन’ सिनेमासाठी शूटिंग करीत असता, त्याने शूटिंगनंतर मला त्याच्या बाईकवर राईड करणार का, असं विचारलं.. मी होकार दिला. त्याच्या बाईकवर बसताच त्याच्या केसांतून मंद सुगंधाची झुळूक मला आल्दाददायक वाटली; आणि नंतर प्रत्येक भेटीत सैफच्या केसांमधून हाच चिरपरिचित सुगंध येऊ लागला. आमच्या दोघांमध्ये हेच ते हलके-फुलके आणि रोमॅन्टिक क्षण उमलत गेलेत. जरी सैफ राजबिंडा-देखणा असला तरी टशनपूर्वी आमच्यात कसलाही अगदी मैत्रीचाही दुवा नव्हता.. पुढे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि यथावकाश लग्नही केले. 
बेबो आरक्त होत सांगत असते, सैफूला माङो लांब आणि कोंडाविरहित केस आवडतात. सैफूने त्याच्या बहुतेक सिनेमांमधून केसांना वेगळाच लूक दिलाय, त्यामुळे तो प्रत्येक सिनेमात त्या-त्या भूमिकांमध्ये -व्यक्तिरेखांमध्ये सहजच शिरतो. मग, त्याचं ते ओले-ओले गाणं असो, परिणिता सिनेमा असो किंवा ओंकारामधला लंगडा त्यागी असो.. त्याने केसांबाबत खरंच विविध प्रयोग केलेत, सहसा असं करण्यासाठी स्टार्स तयार होत नाहीत.
करीना कबुलीजबाब देते, तिने केसांच्या बाबतीत तिच्या भूमिकांमध्येही फार कमी प्रयोग केलेत. बहुतेक सिनेमांमध्ये तिने तिचे केस लांब आणि सरळ थोडक्यात मि निमली स्टिक लूक ठेवलाय.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि क जीवनसत्त्व असणं सगळ्यांसाठीच आवश्यक आहे, ज्याचा मी आहारात पुरेपूर वापर करते. आणि आठवडय़ातून एकदा केसांना बदाम तेलाने मसाज करते, शिवाय हा माझा प्रिय श्ॉम्पू वापरते, ज्यामुळे माङो केस सुंदर आणि सैफच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेत.
 
सोशल नेटर्व्िकगपासून चार हात दूर
दीपिकाने प्रसारमाध्यमांच्या घुसखोरी आणि अभिनेत्रींच्या अंगप्रदर्शनाबद्दल जी मोहीम सुरू केलीये त्याबद्दल करीनानं आपलं मत व्यक्त करीत म्हटलं, अभिनेत्रींनी एका ठरावीक मर्यादेर्पयत पटकथेची गरज असल्यास शरीरप्रदर्शन करणं मुळीच गैर नाही. माङो आजोबा राज कपूर यांनी ‘संगम’ सिनेमात वैजयंतीमाला आणि ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये मंदाकिनीला श्वेतधवल-पारदर्शक वस्त्रंमध्ये रसिकांसमोर पेश केलं होतं. तेव्हा मीडिया इतका नव्हता, आणि आक्रमक तर मुळीच नव्हता.. त्यातून कुणाहीबद्दल स्टार्सना आपली मतं मांडण्यासाठी सोशल नेटवर्किग साईट्स उपलब्ध नव्हत्या.. एकूणच मी या सोशल नेटवर्किग साइट्सपासून चार हात दूर राहते. शूटिंगव्यतिरिक्त मी भारतीय शालिन परिधान वापरलेले सैफला आवडतात..
हेही सांगायला बेबो विसरली नाही..
हा दीपिकाच्या स्वयंघोषित प्रचारावर वार तर नव्हता..़