Join us

तापसी पन्नू म्हणते, यंदा कर्तव्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 18:01 IST

अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाच्याही चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देतापसी पन्नूला इतक्यात करायचे नाही लग्न

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा साखरपुडा झाल्यानंतर दीपिका पादुकोण- रणवीर सिंग आणि आलिया भट-रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दल चर्चा सगळीकडे सुरू असताना आता अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाच्याही चर्चेला उधाण आले आहे. बॅडमिंटनपटू मिथियास बोयबरोबर तापसी रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्याबरोबर लग्न करण्याच्या प्रश्‍नाला मात्र तापसीने नकारार्थी उत्तर दिले आहे. 

तापसी म्हणाली की इतक्‍या लवकर लग्न करायचे नाही. सध्या तर नवीन सिनेमांच्या खूप चांगल्या ऑफर येत आहेत. त्यामुळे सध्या तरी आपल्या फिल्मी करियरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे.तापसी व मिथियास यांनी हिल स्टेशनवर सुट्टी एन्जॉय केल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. मिथियासबरोबर तापसी कधीपासून रिलेशनशीपमध्ये आहे आणि लग्नाबाबतचा तिचा प्लान काय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तिने काहीही सांगितले नाही.तिचा नुकताच मनमर्जिया हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सध्या ती खूप खूश आहे. याबाबत ती ट्विटरवर म्हणाली की, हे वर्ष तिच्यासाठी खरोखरच खूप फलदायी ठरले. करिअरचा ग्राफ या वर्षात खूपच उंचावला, म्हणून ती भलतीच खुशीत आहे. या वर्षात तिला ज्या ज्या व्यक्‍तींनी मदत केली आणि त्यांच्या सहाय्याने तिला व्यवसायिक यश मिळाले, त्या सगळ्यांचे तिने आभार मानले आहेत.

तापसीच्या रिलेशनशीपबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :तापसी पन्नू