Join us

'त्या' सेक्सी कमेंटसाठी दिग्दर्शकाने मागितली तमन्नाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 14:27 IST

अभिनेत्री तमन्ना भाटीयाच्या कपडयांवरुन तिच्याबद्दल सेक्सी कमेंट करणारा दिग्दर्शक जी.सूरजने अखेर तमन्नाची माफी मागितली आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 27 - अभिनेत्री तमन्ना भाटीयाच्या कपडयांवरुन तिच्याबद्दल सेक्सी कमेंट करणारा दिग्दर्शक जी.सूरजने अखेर तमन्नाची माफी मागितली आहे. दक्षिणेत अनेक हिट चित्रपट देणा-या तमन्नाने हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिका केल्या आहेत. तमन्नाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'काथी संदई' सिनेमाचा दिग्दर्शक जी. सूरजने तिच्या कपडयांवर सेक्सी कमेंट केली होती. 
 
सूरजच्या कमेंटवर वैतागलेल्या तमन्नाने सोमवारी टि्वटरवरुन जाहीर नाराजी व्यक्त करत माफीची मागणी केली. सूरजची कमेंट माझाच नाही समस्त महिलांचा अपमान करणारी असल्याचे तमन्नाने सांगितले.  महिला सबलीकरणावर आधारीत दंगलसारखा चांगला सिनेमा मला सूरजच्या कमेंटमुळे अर्ध्यावर सोडून बाहेर पडावे लागले. सूरजच्या कमेंटने मला त्रासही झाला आणि संतापही आला आहे. त्याने माझीच नव्हे इंडस्ट्रीतल्या सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे असे टि्वट तमन्नाने केले.  
 
'काथी संदई'च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने बोलताना सूरजने हिरॉईन या छेटो कपडे घालण्यासाठीच असतात. प्रेक्षक इतके पैसे खर्च करुन येतात त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत असे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते.