Join us  

निर्मात्याने आरोप फेटाळल्यानंतर जेनिफरने शेअर केला Video, संतापून म्हणाली, "शांत होते कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 4:12 PM

मालिकेत रोशन सोढीच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने असित मोदिंवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या मेकर्स आणि कलाकारांमधले वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. आधी अभिनेते शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर पैसे थकवल्याप्रकरणी आरोप केले. तर आता मात्र आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालिकेत रोशन सोढीच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry) असित मोदिंवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. जेनिफरने एक व्हिडिओ शेअर करत सत्याचा विजय होईल असं म्हटलंय.

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या चेहऱ्यावर संताप आहे. ती म्हणते,"मी शांत आहे याचा अर्थ हा नाही की मी कमजोर आहे. मी गप्प आहे कारण माझा तो स्वभाव आहे , देवाला सगळं माहित आहे, त्याच्या घरी तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही."

अशा आशयाच्या हिंदी कवितेच्या तार ओळी म्हणत तिने असित मोदीला सुनावलं आहे. लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर असित मोदींनी सर्वव आरोप फेटाळून लावले होते. यालाच जेनिफरने या व्हिडिओमधून उत्तर दिलं आहे.

TMKOC : जेनिफरने निर्मात्यांवर केले लैंगिक शोषणाचे आरोप, भिडे मास्तर म्हणाले, "पुरुष मक्तेदारी..."

नेमकं प्रकरण काय?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या २० वर्षापासून सुरु आहे. मात्र आधी शोमधील मुख्य भूमिकेत असलेली दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने मालिका सोडली. त्यानंतर शैलेश लोढा यांनी पैसे थकवल्याचे आरोप केले. तर आता जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ती म्हणाली," गेल्या दोन वर्षांपासून माझा छळ सुरु आहे. एक दिवस निर्माते म्हणाले तुझी रुम पार्टनर नाहीए माझ्या रुममध्ये ये दारु पिऊ. मालिकेची टीम सिंगापूरला गेली होती तिथेही त्यांनी मला रुममध्ये व्हिस्की पिण्यासाठी बोलावले. मी हे बघून शॉक झाले होते. त्यांनी कित्येकदा माझ्यावर कमेंट केली आहे. सुंदर दिसत आहेस असं वाटतं पकडून तुला किस करावं अशा गलिच्छ कमेंट केल्या आहेत."

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामंदार चांदवडकरटिव्ही कलाकारलैंगिक छळ