Join us  

“अस्सल पाहुणे इरसाल नमुने”मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेचे धम्माल किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 7:15 AM

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाही

ठळक मुद्दे मालिकेमध्ये सत्यवाची भूमिका साकारणारी साजरी हिने प्रत्येक प्राण्याला एक खास नाव ठेवले आहे

कलर्स मराठीवरीलअस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कलर्स मराठवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधील कलाकारांनी हजेरी लावली आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दोन कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे देखील कार्यक्रमामध्ये बरीच धम्माल करणार असून काही अनुभव, आणि प्रेक्षकांना माहिती नसलेले किस्से देखील सांगणार आहेत.

कायर्क्रमामध्ये मकरंद यांनी बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला विचारले, मालिकेमध्ये तुझी निवड झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ? त्यावर समर्थ म्हणाला बाबांना आवडले नाही आणि ते म्हणाले नको करू, पण माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिले, पण यानंतर समर्थला अश्रू अनावर झाले काय घडले ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. तसेच मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्राण्यांशी चांगलीच मैत्री झाली आहे. मालिकेमध्ये सत्यवाची भूमिका साकारणारी साजरी हिने प्रत्येक प्राण्याला एक खास नाव ठेवले आहे. गाईचे नाव तांबडी आणि कपिला तांबडीचं वासरू आहे जे खूपच गोंडस आहे त्याच नाव चिंगु ठेवले आहे तसेच घोड्याचे नाव राजा आणि घोडीचे परी नाव आहे. गाढव देखील आहे त्याचे नाव सगळ्यात खास आहे ''गधा भाई''

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्या मेंढ्या सेटवर परतल्या. या घटनेनंतर कळाले कि, जंगलामध्ये ज्याठिकाणी या मेंढ्या होत्या त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो. परंतु त्या बाळूमामाच्या मेंढ्या असल्याने त्यांना काहीच झाले नाही आणि त्या सुखरूप परतल्या. त्यावर संतोष अयाचित म्हणाले, ज्या मामांनी आम्हाला मेंढ्या आणि इतर प्राणी पाठवले त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितले कि, आम्ही मेंढ्याची काळजी नाही घेऊ शकलो त्यावर ते म्हणाले, “काही काळजी करू नका त्या बाळूमामांच्या मेंढ्या आहेत त्यांना हात लावण इतक सोप नाही.” हा खरोखरच एक चमत्कार आहे असं म्हणावं लागेल तसेच प्रत्येक कलाकाराला त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बाळूमामा कोण ? असा प्रश्न देखील विचारला...

तसेच स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या दोघांनी देखील धम्माल असे किस्से सांगितले. स्वप्नील जोशीने त्याचा रामानंद सागर यांच्याबरोबचा किस्सा सांगितला आणि कशी त्याची या क्षेत्रामध्ये एन्ट्री झाली हे देखील सांगितले. मुक्ता आणि स्वप्नील यांनी अंकुश चौधरीसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – सई ताम्हणकर तसेच सतीश राजवाडे यांच्याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट देखील सांगितली. आता हे किस्से आणि गोष्टी काय आहेत हे तुम्हाला या आठवड्यामध्ये कळणार आहे. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंमकरंद अनासपुरेस्वप्निल जोशीमुक्ता बर्वेअस्सल पाहुणे इसराल नमुनेकलर्स मराठी