Join us

स्वप्निल-अंजनाचे लेट नाइट वर्क

By admin | Updated: October 29, 2015 00:18 IST

चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भन्साली निर्मित चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भन्साली निर्मित चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी स्वप्निल आणि त्याची सहनायिका अंजना सुखानी प्रचंड मेहनत घेत आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगचे फर्स्ट शेड्यूल सुरू असून नुकताच स्वप्निल आणि अंजनाच्या एका रोमॅँटिक शॉटचे शूटिंग पार पडले आहे. अंजना सुखानी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करीत आहे. यापूर्वी अंजनाने सलाम-ए-इश्क, संडे, दे ताली, अल्लाह के बंदे, अशा अनेक हिंदी, तर ना ओपिरी, डॉन सीनू, मलेयली जोथेयली, यंग मलंग अशा विविध भाषांतील चित्रपटांत अभिनय केला आहे. या चित्रपटात अंजना स्वप्निलसोबत मुख्य नायिका साकारत आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत.