Join us  

Sushmita Sen : ये रिश्ता क्या कहलाता है...! सुश्मिता सेन एक्स-बॉयफ्रेन्डच्या प्रेमात? चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 6:30 PM

Sushmita Sen : एका वर्कआऊट व्हिडीओनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा सुश्मिताच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झालीये...

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन (Sushmita Sen) व ललित मोदी ( Lalit Modi ) यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चेचा एक अंक प्रचंड गाजला होता.  खुद्द ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत धमाका केला होता. पण सुष्मिताने यावर बोलणं टाळलं. या नात्यावर खुलासे करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तिने शांत राहणं पसंत केलं. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. यातून सुश अगदी थोडक्यात बचावली. तब्येत ठणठणीत झाल्यावर ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. तिने तिचं संपूर्ण लक्ष फिटनेसवर केंद्रीत केलं आहे. तिचे एक ना अनेक वर्कआऊट व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. आता यापैकीच एका वर्कआऊट व्हिडीओनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा सुश्मिताच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झालीये.

होय, सुश्मिताने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओत तिचा एक्स बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल ( Rohman Shawl) दिसतोय. यात सुश्मिता रोहमनसोबत वर्कआऊट करतेय. तिची मुलगी अलीशाही व्हिडीओत आहे. हा व्हिडीओ पाहून चर्चेचा बाजार गरम आहे. सुश्मिता व रोहमन यांच्यात नेमकं काय सुरू आहे, हेच चाहत्यांना कळायला मार्ग नाहीये. अनेकांनी यावरून तर्कवितर्क लावणंही सुरू केलंय. सुश्मिता व रोहमन पुन्हा एकत्र आल्याचं पाहून अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुष्मिताने तिचे रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती. अगदी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगच्या वृत्तावर रोहमन शॉलने देखील प्रतिक्रिया दिली होती. ‘त्यांना आनंदी राहू द्या, प्रेम ही एक सुंदर भावना आहे. जर त्यांनी एकमेकांना निवडलं असेल तर ते एकमेकांना अनुरुप आहेत. एखाद्यावर हसून तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच हसा. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हाला होतोय. प्रेम पसरवा, द्वेष नाही,’ असं रोहमन म्हणाला होता.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉलबॉलिवूड