Join us

सुश्मिता सेन झाली मिस युनिव्हर्स स्पर्धेची जज

By admin | Updated: January 22, 2017 16:55 IST

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने 23 वर्षांपूर्वी 1994 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने 23 वर्षापूर्वी 1994 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं. अवघ्या 16 वर्षांच्या वयात सुश्मिताने हा किताब पटकाविला होता. त्यावेळी तीने देशाचे नाव उंचावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सर्वांची मने जिंकण्याचे कसब अवगत असणाऱ्या सुश्मिताच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. 
 
आज 23 वर्षांनंतर सुश्मिताला मिस युनिव्हर्स स्पर्धेची जज म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.  सुश्मिता सेन सध्या या सौंदर्य स्पर्धांच्या निमित्ताने मॅनिला येथे रवाना झाली आहे. या ठिकाणी ती 65 व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेसाठी परीक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. परीक्षक होण्याचा हाच आनंद सुश्मिताने तिच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून व्यक्त केला आहे.