देशाला आयपीएलची संकल्पना देऊन जलद क्रिकेटचे वेड लावणारे व घोटाळ्याचा आरोप असलेले ललित मोदी यांनी ट्वीट करून खळबळ उडवून दिली. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत त्याने तिला उल्लेख ‘बेटर हाफ’ केला. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा बार कधी उडाला अशी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियात त्यांच्या लग्नाबाबत चर्चा उडू लागली. काहींनी त्यांचे लग्न झाल्याचेही वृत्त दिले. मात्र त्यानंतर काही वेळातच आम्ही डेटिंग करत असल्याचे ललित मोदींनी जाहीर केले.
पहिले ट्वीटमाझ्या जवळच्या लोकांसोबत मालदीवचा दौरा आटोपून लंडनला परतलो आहे. माझी बेटरहाफ सुश्मिताचा उल्लेख टाळता येणार नाही. आता आयुष्याची नवी सुरूवात आहे.
‘ये क्या हो रहा भाई’ ‘चक्कर आ रहे है’ ललित मोदी आणि सुश्मिता सेन हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त येताच सोशल मीडियात एकच खळबळ उडाली. ललित मोदींनी ट्विट केलेले दोघांचेही फोटो लगेचच व्हायरल झाले. अभिनेता राजपाल यादव आणि अक्षय कुमारचे फोटो वापरुन ‘ये कब हुआ’, ‘ये क्या हो रहा भाई’, ‘ये सब कैसे हुआ’, ‘अरे मुझे चक्कर आने लगे है’ अशा गंमतीशीर मेसेजसह एकाहून एक मजेशीर मिम्स नेटकऱ्यांनी पोस्ट करण्यास सुरूवात केली.