Join us

फ्लॉप के बाद बने सुपरस्टार!

By admin | Updated: July 1, 2017 03:10 IST

चित्रपटसृष्टीत नाव कमविणे म्हणावे तेवढे सोपे नाही. गॉडफादर असो वा नसो, इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी दमदार

चित्रपटसृष्टीत नाव कमविणे म्हणावे तेवढे सोपे नाही. गॉडफादर असो वा नसो, इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी दमदार अभिनयाबरोबरच कष्ट करण्याची अपार क्षमता असायलाच हवी. जो यामध्ये कमी पडतो, तो कायमचाच या रेसमधून मागे पडतो. त्यामुळे बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही; मात्र काही असेही कलाकार आहेत, ज्यांची सुरुवात फ्लॉपने झाली. मात्र, आज ते इंडस्ट्रीत सुपरस्टार्स आहेत. एका सुपरहिट चित्रपटामुळे ते रातोरात सुुपरस्टार झाले. अशाच सुपरस्टार्सच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा वृत्तांत...अमिताभ बच्चन१९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुुपरस्टार्सचा प्रवास खूपच रंजक असा आहे. कारण सुरुवातीचे एका पाठोपाठ एक चित्रपट अपयशी ठरत असताना, त्यांनी कधीच निराश होऊन स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर नेले नाही. उलट ते जिद्दीने स्वत:ला सावरत नव्या आव्हानाला सामोरे जात होते. ‘आनंद’ आणि ‘परवाना’ या चित्रपटात काम करीत असताना त्यांना खूप अपेक्षा होत्या. ‘आनंद’ साठी तर त्यांना फिल्मफेअरही मिळाला होता. परंतु कमाईच्या बाबतीत हे चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकले नव्हते. पुढे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी १९७३ मध्ये ‘जंजीर’ची निर्मिती केली. या चित्रपटाने बॉलिवूडमधील रोमॅण्टिक चित्रपटाचा ट्रेंडच बदलून टाकला. येथूनच ‘अँग्री यंग मॅन’च्या सुपरस्टार करिअरचा प्रवास सुरू झाला. ऐश्वर्या राय-बच्चनआपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. मैत्रेयी देवीच्या बंगाली पुस्तकाचे रूपांतर असलेल्या या चित्रपटात ऐशचा अभिनय खूपच सरस राहिला. सलमान खानसोबतची तिची जोडी त्यावेळी खूपच चर्चिली गेली. करिना कपूरकरिना कपूर हिचीही बॉलिवूड सुरुवात काहीशी पडतझडतच झाली. मात्र, ‘रिफ्यूजी’ या चित्रपटानंतर तिच्या फॅन फॉलोर्इंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुढे २००७ मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही केले गेले. या चित्रपटाने तिला सुपरस्टारचा दर्जाही मिळवून दिला. अक्षयकुमारमार्शल आर्ट ट्रेनर, असिस्टंट फोटोग्राफर, बॅकग्राऊंड डान्सर आणि मॉडेल आदी क्षेत्रात काम केल्यानंतर १९९१ मध्ये अभिनेता अक्षयकुमार याने ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. मात्र, हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. पुढे तो १९९२ मध्ये अब्बास मस्तान यांच्या ‘खिलाडी’ या चित्रपटात झळकला. त्यानंतर अक्षयचे करिअरच बदलून गेले. त्याला ‘खिलाडी’ अशी ओळख मिळाली. पुढे या चित्रपटाची सीरिज बनविण्यात आली. त्यामुळे अक्षयकडे सगळेच अ‍ॅक्शन हिरो म्हणून पाहू लागले.श्रीदेवीतेलुगू इंडस्ट्रीमध्ये लहानपणापासून काम करणाऱ्या श्रीदेवीने १९६७ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. पुढे १९७९ मध्ये तिने ‘सोल्वॉँ सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र, तरी देखील तिच्याकडे स्ट्रगलर अ‍ॅक्टर म्हणूनच बघितले जात होते. जेव्हा ती १९८३ मध्ये ‘हिम्मतवाला’ या चित्रपटात अभिनेता जितेंद्रसोबत झळकली तेव्हा तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. ‘नैनो में सपना’ या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. येथूनच श्रीदेवीचा सुपरस्टारचा प्रवास सुरू झाला.