Join us  

अंकिता लोखंडेसाठी धावून आली सनी लिओनी, ट्वीट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:01 AM

Bigg Boss 17 : सनी लिओनीचा अंकिता लोखंडेला फुल सपोर्ट, अभिनेत्रीसाठी केलेलं ट्वीट व्हायरल

मराठमोळी अंकिता लोखंडे तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'बिग बॉस १७'च्या घरातील अंकिता आणि विकीमधील वाद संपण्याचं काही नावच घेत नाहीये. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकीमध्ये छोट्या छोट्या कारणावरुन खटके उडायला सुरुवात झाली होती. विकीच्या सासूनेही अंकिताला 'बिग बॉस'च्या घरात येऊन सुनावलं होतं. त्यामुळे त्यांना ट्रोलही केलं गेलं होतं. अंकिताच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीला पाठिंबा देत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या होत्या. आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अंकितासाठी धावून आली आहे. 

सनीने अंकितासाठी खास ट्वीट केलं आहे. यामधून तिने अंकिताला पाठिंबा दर्शविला आहे. "बिग बॉस १७च्या फायनलसाठी ऑल द बेस्ट अंकिता. मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे", असं सनीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच तिने #AnkitaLokhande आणि #AnkitalsTheBoss हे हॅशटॅगही वापरले आहेत. सनीने अंकितासाठी केलेलं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. 

दरम्यान, अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहरे आहेत. 'बिग बॉस'च्या घरात आल्यापासूनच विकीने त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. अंकिता 'बिग बॉस १७'चा विजेतेपदाची दावेदार मानली जात आहे. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने सिनेमांतही काम केलं आहे. २०२१ साली अंकिताने विकीबरोबर लग्न करत संसार थाटला. पण, 'बिग बॉस'च्या घरातील वादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसनी लिओनीबिग बॉस